आपल्या सर्वांना माहित आहे कि मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट होऊन गेले तसेच अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळाल्या. अभिनेते किंवा अभिनेत्री यांनी त्याच्या अभिनयातून लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. असाच एक चित्रपट ज्याचे नाव सर्वांना माहित असेल ” सैराट “. या चित्रपटाने लाखो नाही तर करोडो प्रेक्षकांचे मन जिंकले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ” सैराट ” चित्रपट हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध चित्रपट ठरला. पूर्ण भारत भर हा चित्रपट गाजला आणि करोडो रुपयांचा गल्ला ह्या चित्रपटाने मिळवला. सैराट चित्रपट हा प्रेम कहाणी वर आधारित आहे. ज्या मध्ये प्रमुख पात्र आर्ची आणि परश्या आहेत.
आर्चीची भूमिका रिंकू राजगुरू हिने केली आहे तर परश्या हे पात्र प्रशांत काळे या अभिनेत्याने केले आहे.
चित्रपटात आरची आणि परश्याचे एकमेकांवर खूप प्रेम असते पण घरच्यांच्या विरोधाला बघून ते दोघे पळून जातात व लग्न करतात.
परंतु काही वर्षांनंतर आर्चीचा भाऊ त्यांना भेटण्याच्या निम्मिताने त्यांच्या इथे जातो व परश्या आणि
आर्चीच्या प्रेम कहाणीचा अंत करून टाकतो… जर तुम्ही चित्रपट बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा-
सैराट चित्रातील अभिनेत्री आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयातून आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत फक्त आणि फक्त आर्चीचे नाव होते. कारण सैराट चित्रपटाने सम्पूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. सर्वांना प्रश्न पडला असेल कि रिंकूचे आई व वडील काय करतात व कसे दिसतात. आज आम्ही तुम्हाला रिंकू राजगुरू हिच्या कुटुंबाची ओळख करून देणार आहोत. रिंकूचे आई व वडील दोघे हि शिक्षक आहेत. त्यामुळे दोघेही रिंकूच्या शिक्षणाबाबत खूप लक्ष देतात.
माघे बातमी आली होती रिंकू शिक्षण सोडून देत आहे पण ती बातमी चुकीची होती कारण तिच्या आई वडिलांची इच्छा आहे कि रिंकूने अभिनयाबरोबर आपले शिक्षण हि पूर्ण करावे. रिंकूच्या वडिलांचे नाव महादेव राजगुरू आहे तर तिच्या आईचे नाव आशा राजगुरू आहे.
सैराट’ चित्रपटातून धडाकेबाज एंट्री करत सर्वांची मनं जिंकणाऱ्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुचे आई-वडीलही आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा, लाख मराठा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.‘एक मराठा, लाख मराठा’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणावर आधारित आहे.
या चित्रपटात हा तरुण आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतो. कालांतराने त्याच्या संघर्षाचं रुपांतर मोठ्या जनआंदोलनात होतं. मात्र हे झालेलं रुपांतर त्याला कळतं नाही. त्याच्या समोर केवळ एकच लक्ष्य असतं, आणि ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणं हे.
‘एक मराठा लाख मराठा’ हा चित्रपट गणेश शिंदे या तरुणानं दिग्दर्शित केला आहे.
चित्रपटाची निर्मिती साई सिने फिल्म्सनं केली आहे, तर संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसंच, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी,
अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्वकर्मा आणि राधिका पाटील यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
छत्रपती उदयराजे भोसले यांच्या हस्ते अलिकडेच या चित्रपटातं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे.