नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १ :
हसायचे नाही फक्त आवडला तर पुढे जसाच्या तसा पाठवा…….जावई सासरवाडीत एक महिना होता…!
वैतागुन सासरा ने विचारले …जावईबापु परत कधी जाताय …
जावई : – पण का ? सासरा : – अहो भरपुर दिवस झाले ..
जावई : – अहो तुमची मुलगी तर आमचे कडे सहा सहा महिने राहते…सासरा : – पण आम्ही तिचे लग्न करुन दिले आहे.
जावई : – मग मला काय तुम्ही हिथे पळवुण आणलाय काय ? माझे पण लग्न झालेय ना तिच्याशी.
विनोद २ :एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही! एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??
नवरा- आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस महाबळेश्वरला हनिमूनला गेलो होतो. तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन बायकोला खाली पाडली.. ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली “हे तुझ पहिल्यांदा झालं”, थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली ”
हे तुझ दुस-यांदा झालं” आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.
मी ओरडलो, ” ए बावळट, ! …..।तू घोड्याला मा र लस ? पागल! ” तेव्हा ती मला रागात बोलली “हे तुझ पहिल्यांदा झालं”.
आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच … साधा वाद पण नाय केला कधी .. आम्ही अगदी आनंदी संसार करतो
विनोद ३ :
ती बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता ..ती म्हणाली… नाही मी तशी मुलगी नाही.. मला अजुण पुढे खुप शिकायचय..
खुप मोठं व्हायचय.. मला अगोदर माझं करियर घडवायचंय..माझी ध्येय खुप मोठी आहेत..! तेंव्हापासून सतत एकच प्रश्न
ती सध्या काय करते ती सध्या काय करते ती सध्या काय करते…. काल दिसली..
शेतात खोडवी गोळा करताना… मला बघुन बांधा-बांधानं पळत सुटली.. ढेकूळ हाननार होतो , पण जाऊ दे म्हंटलं ..
विनोद ४ :
गण्या सैराट बघुन आल….दुसर्या दिवशि एक पोरगि रस्त्यात भर उन्हात तिच्या बाईक सोबत इकड तिकड बघत होति…ह्याला लगेच चेव आला गेल बाइक चालू करायला….हसुन विचारल एसकुस मि मि काइ मदत करु का…पोरगि नुसति मान हलवुन हो बोल्लि….हे लागल किका मारायला…पहिलि किक…फेल गेलि…हसुन बोल्ल असुदे होत अस कदि मदि..दुसरि पण फेल गेलि… परत हसुन बोल्ल…होइल होइल चालु…पोरगि पण थोडि हसलि…
तिसरि पण फेल.. चाैथि पण…*पाच…..आठ……..पंधरा…….30-40 किका मारुन मे ल….गाडि काय चालु होइना……
शेवटि कटाळुन पोरिला विचारल! नक्कि ……कशामुळ बंद पडलिय??? पोरगि बोल्लि….. पेट्रोल संपलय…….माझे मीस्टर गेलेत आणायला गण्या जाग्यावरच बे शुद्ध.
विनोद ५ :
एकदा एका बायकोने आपल्या नवर्याला विचारले..बायको-का ओ जर मी तुम्हाला 3-4 दिवस दिसले नाहीतर..
तुम्हाला कस वाटेल?? नवरा मनातल्या मनात जाम खुष झाला.. आणि पटकन बोलला.. नवरा-मला तर खूप बर वाटेल आणि मी लय खुष होईल..
मंग काय.. बायको सोमवारी नाही दिसली.. मंगळवारी नाही दिसली.. बुधवारी नाही दिसली.. गुरूवारी नाही दिसली.. शुक्रवारी जेव्हा डोळ्याची सुज कमी झाली..तेव्हा कुठ थोडी थोडी दिसली!
विनोद ६ :
एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालून बायकोला विचारतो – मी कसा दिसतोय?
बायको: (चिडून) असा वाटतंय फाटलेल्या सॉक्स मधून अंगठा बाहेर आलाय.
विनोद ७-
कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात….त्यांना भेटायचं असतं…
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये…
मुलगी नाणं खाली फेकते….. पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो…
मुलगी : एवढा उशीर का केलास??? मुलगा : मी ते नाणं शोधत होतो….पण सापडलच नाही 😮
मुलगी : अरे मूर्खा….सापडणार कसं??? मी दोरा बांधून खाली फेकलं होतं…मी घेतलं ते ओढून
विनोद ८ –
एका बाईला १० मुलं असतात.
पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय? बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय? बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत? बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं? बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना…
विनोद ९-
बंडू : एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.
पांडू : मग रे ?
बंडू : मग काय …. मी त्याला बोललो, तू करून घे निवांत …. माझी चड्डीतच झालीये !!!