Breaking News

दा दा कों डके एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात आणि विचारतात काय बाई आहेत का?

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- बायको: (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?
नवरा : आलो आलो आलो आलोच (पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)
बायको: अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय. नीट रगडून धुवा. मला स्वंयपाकाचं काम आहे मी जाते….
तात्पर्य: अति घाई संकटात नेई…… नवरा बेशुद्ध….

विनोद २- मुलगी : मी राखी आणली आहे, बांधुन घे……मुलगाः नाही.
मुलगी : का? मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का?
सन्नाटा . . . मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अन हळुच पर्स मधुन मंगळसयत्र काढुन म्हणते:
तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात, नाहतीर मी तुला राखी बांधते.
तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल……

विनोद ३- मुलगी – उद्या माझं हार्ट ऑपरेशन आहे.. मुलगा – माहिती आहे ..
मुलगी – आय लव्ह उ….. मुलगा – आय लव्ह उ २
ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात..
मुलगी – राहुल कूठ गेला…… वडील – तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय? मुलगी – नाही!!! (आणि जोरजोरात रडू लागते..)
वडील – आव मजाक केली न व!! बाहेर गेला थो खर्रा थुकाले

विनोद ४- गण्या, मन्या,सोन्या पार्टीला गेले तिथे गेल्यावर आठवले. ” बि अरच्या बाटल्या” तर घरीच राहील्या सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन” बि अरच्या बाटल्या” घेऊन यायच्या….
गण्या : “जाईल पण एका अटीवर मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही. दोघांनी मान्य केले…. 20 मिनिट झाले. 40 मिनिट झाले. 2 तास झाले पण गन्या काही आला नाही
दिवस मावळतीला आला तरी काही गन्या येण्याचे चिन्ह दिसेना दोघांनी विचार केला कि आता मटन खाऊ.
जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार तेवढ्यात गण्या. झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला.
”असं करायच असेल तर मी नाही जाणार घरी…!!!!!” गण्याला तुडवून तुडवून मारला…

विनोद ५- हऱ्या : लाईट गेली वाटत ! नाऱ्या : उकडतंय….. पंखा लाव ना !
हऱ्या : वाटलच मला अस काय तरी येड्यासारख बोलणार तू….. नाऱ्या : का रे
हऱ्या : आरे ! पंखा लावल्यावर मेणबत्ती विझेल ना !!!!

विनोद ६– एक मुलगी वाहन परवाना काढायला जाते.. ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि . तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल…
मुलगी- offcourse कोंबडी….. ऑफिसर – तुम्ही fail झालात घरी जा.. (ती घरी जाते आणि परत दुसर्या दिवशी लायसेंस काढायला येते
परत ऑफिसर तोच प्रश्न विचारतो, मुलगीपरत तेच उत्तर देते, तिला परत नापास व्हावे लगते) 7/8 वेळा झाल्यावर
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय मा राल?
मुलगी- offcourse “म्हातारा”….. ऑफिसर- तुम्ही fail झालात घरी जा.. (मुलगी चिडते)काय हो मी काहीही उत्तर दिले तरी .तुम्ही मला नापसच करता…
तुम्ही सांगा बरे मग त्याच प्रश्नाचे उतर…… ऑफिसर- *ब्रेक मारिन मी ब्रेक… आन म्हणे बोर्डात 95% मिळाले* जा घरी आता..

नक्की वाचा- माझी छकुली मोठी झाली. एकेदिवशी सहजच म्हणाली,” बाबा, मी कधी तुला रडवलय का रे ?” मी म्हटलं,” हो .” “कधी ?” तिनं अधिरतेनं विचारलं.
मी म्हणालो,” तु एक वर्षाची असताना मी तुझ्या समोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं कारण मला बघायचं होतं तु काय उचलतेस.
तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतेस. जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो. मला बघायची होती तुझी निवड. तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि
मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.तु रांगत रांगत पुढे आलीस, मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकतो. ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तु मला अक्षरशः रडवलसं.

विनोद ७- दा दा कों डके एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात
दादा: काय बाई आहेत का?
नोकर : बाई जरा विसावा घेत आहेत
दादा : ठीक आहे , त्यांना सांगा एक विसावा आलाय….

विनोद ८- सरकारी नौकरी साठीचा इंटरव्यू….. साहेब: तू अ पंग आहेस? गण्या: हो, माझ्या दोन्ही गोट्या बौम्ब ब्लास्ट मधे गेल्या
साहेब: ठीक आहे तू उद्यापासून कामावर येउ शकतोस, कामाची वेळ 9.00 ते 5.00, पण तू 11 वाजता येउ शकतोस.
गण्या: 11 ला का ??? साहेब: आम्ही 9 वाजता येउन 2 तास गो ट्याच खाजवत असतो….. तू लवकर येउन काय करणार?

About Marathi Society

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *