नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १- एकदा एकामुलीने आपल्या फेस बुक आणि व्हाट्स अँप वर स्टेटस ठेवले ……
मुलगी : “हॅलो फ्रेन्ड्स, मी मावशी झाले”… आपल्या बंड्याने तो स्टेटस बघितला…..
व लगेच बंड्याने त्या स्टेटसच्या खाली दोन कॉमेंट टाकल्या…….
बंड्या: “कोणत्या हाॅस्पिटलला? किती पगार आहे?”
मुलीने बंड्याला शून्य सेकंदात “ब्लॉक” केले…… बंड्याचा प्रामाणिक प्रश्न.. माझं काय चुकलं??
विनोद २- सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले. . अगं या उटण्याचा उग्र वास येतोय… पत्नी:-अरे देवा..देवा…देवा….काय बाई तुमचा हा वेंधळेपणा….मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या…. एक उटण्याची व दुसरी हिंगाची .. तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली….अन फासली सगळ्या अंगाला. .. काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा…कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. …!!!! पती – अग अग…तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय……. तू कशाला एवढं टेंशन घेतेस? पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो….. इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय?.. तात्पर्य….बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात……बिच्चारा हिंगाळलेला नवरा…
विनोद ३- रण्या : (बायकोला) आज टिफिन मधे काय भरलस….???
बायको : फार्म फ्रेश चिली रेड टोमेटोस विथ इंडियन पील्ड मीडियम कट पोटैटोज़ विथ फ्राय ऑईल राईस
रण्या: WOW काहितरी नविन डिश दिसतेय….. ऑफिसला जाऊन बघितलं तर
फोडणीचा भात होता…… घ्या,अजुन करा शिकलेली मुलगी
विनोद ४- एकदा मण्याचे त्याच्या बायकोशी जोरदार भांडण होते…. मन्याला ते माहित पडते….
गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण झाले ना ?? मिटले का भांडण ???
मन्या : हो मग ..ती चक्क गुडघ्यावर रांगत रांगत माझ्याजवळ आली होती..
गण्या : अरे बापरे हो का.? मग काय म्हणाल्या रे वहिणी…!
मन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर…. मारणार नाही मी……
विनोद ५- बंडयाच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात…..
सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे,
नुसतेच पाय दाखवून बंडयाला तो प्राणी ओळखायला सांगतात……
बंडया: काय ओळखू येत नाय….
इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
बंडया: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा…..
विनोद ६- एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात… बहिण किचनमध्ये असते.
तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,
बहिण : मुलगा कसा आहे? भाऊ : मुलगा चांगला आहे, इंजिनीयर आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो….
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो? भाऊ : “फँड्री”
विनोद ७- नवीन लग्न झालेले नवरा-बायको
लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोला विचारले…
नवरा: जानू तुला कसं वाटत आहे ???
बायको: आहो तुम्ही तर मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली …… नवरा पलंगावर बेशुद्ध